आमदार शिंदे यांच्या निवेदनानंतर जेऊर रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांब्यासाठी रेल्वे बोर्ड सकारात्मक
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेसला थांबा मिळावा तसेच अपुऱ्या सुविधा व्यवस्थित कराव्या अशी मागणी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्याकडे केली आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांचे मुंबई येथील स्वीय सहाय्य्क समाधान कांबळे यांनी जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांना भेटून पत्र दिले व आमदार श्री.शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आणली आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून निश्चितपणे जेऊर येथे हुतात्मा एक्सप्रेस सह इतर मागण्या येत्या काही दिवसांमध्ये थांबा मिळावण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत जनरल मॕनेजर यांनी व्यक्त केले. अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील प्रवाशांना हा एक चांगला पर्याय निर्माण होणार आहे.