शेटफळ येथील हर्षाली प्रशांत नाईकनवरे यांना सोलापूर सोशल फाउंडेशनचा आदर्श महिला शेतकरी पुरस्कार जाहीर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील जिजाऊ महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली प्रशांत नाईकनवरे यांना सोलापूर सोशल फाउंडेशनचा आदर्श महिला शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना श्रीमंती सोलापूरची या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
हर्षाली नाईकनवरे यांनी कृषी क्षेत्रात महीला शेतकरी गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व शेतीमधील पण पुरूषांची मक्तेदारी समजली जाणारी कामे स्वतः करून उत्कृष्ट शेती करत विविध पिकांमध्ये भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी झाल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.तीस जुलै रोजी माजी सहकारी व पणन मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करमाळा येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.यावेळी ग्रामसुधार समीतीने अध्यक्ष ॲड डॉ.बाबुराव हिरडे उद्योजक शिवाजी सरडे, डॉ निलेश मोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मंडळींकडून अभिनंदन केले जात आहे.