पोंधवडी येथे ३० जुलैला निवृत्ती महाराज देशमुख यांचा किर्तन सोहळा

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : स्व.बाबासाहेब महादू कोडलिंगे व स्व. यशोदा बाबासाहेब कोडलिंगे यांच्या मातृ-पितृ स्मृतीदिनानिमित्त ३० जुलैला पोंधवडी (ता. करमाळा) येथे थोर समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर ) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा किर्तन सोहळा सायंकाळी चार ते सहा या वेळेत पोंधवडी येथे होणार आहे.

यावेळी विधानपरिषद आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार नारायण (आबा) पाटील, म. राज्य ओबीसी युवा मोर्चाचे योगेश टिळेकर, म.राज्य जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे-पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्षा विनोद दळवी, जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा तृप्ती साखरे, जि.प.भाजपा कुळधरणचे अध्यक्ष गणेश जंजीरे, उद्योगपती भाऊसाहेब जंजीरे (पुणे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी किर्तनाची साथ कोर्टी येथील शिवकृपा बहुउद्देशीय श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था तसेच भजनी मंडळ, पोंधवडी, विहाळ, कोर्टी, राजुरी, सावडी, उमरड, पोफळज, सोगाव, मोरवड, थेरवडी, राशीन पंचक्रोशी भजनी मंडळ देणार आहेत. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नवनाथ बाबासाहेब कोडलिंगे, मनोहर बाबासाहेब कोडलिंगे, दादा बाबासाहेब कोडलिंगे यांनी केले आहे.

मातृ-पितृ स्मृती दिनानिमित्त ३० जुलैला अनाथ व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप, अनाथ मुलांचे वार्षिक पालकत्व स्विकारणे, पाणपोईचे उद्घाटन तसेच वृक्षारोपण व कन्यावृक्षांचे वाटप आदी सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.

