विहाळचे मा. उपसरपंच महादेव चोपडे यांचे निधन - Saptahik Sandesh

विहाळचे मा. उपसरपंच महादेव चोपडे यांचे निधन

महादेव (अण्णा) चोपडे

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.७: विहाळ येथील ज्येष्ठ नागरिक, माजी उपसरपंच तथा सामाजिक व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे महादेव काशिनाथ चोपडे (अण्णा)(वय ८२) यांचे अल्प आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महादेव चोपडे यांनी गावच्या सामाजिक ,धार्मिक व राजकीय जीवनात  उत्स्फूर्त सहभाग घेतला.  उपसरपंच म्हणूनही त्यांनी गावाच्या विकासात मोठे योगदान दिले.
हुलगेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय चोपडे, आदर्श शेतकरी प्रेमराज चोपडे आणि सुनील चोपडे यांचे ते वडील होत. तर मा. उपसरपंच सौ.अश्विनी संजय चोपडे यांचे ते सासरे होत.
महादेव चोपडे (अण्णा)यांच्या निधनाने  विहाळ ग्रामस्थांमध्येही मोठी शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!