देवळालीत अवैध ‘दारू विक्री’ बंद करण्याची ‘भिमसरकार सोशल ग्रूप’च्यावतीने मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : देवळाली (ता.करमाळा) येथे यात्रा शिवजयंती,भिमजयंती निमित्त चार दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या चार दिवसांत गावातील कायदा व सूव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी ‘भिमसरकार सोशल ग्रूप’च्यावतीने करमाळा पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी आरपीआय(आ) चे यूवा जिल्हाध्यक्ष यूवक नेते यशपाल कांबळे हे उपस्थित होते. किमान चार दिवस तरी अवैध दारू विक्री बंद झाल्यास गावातील गोंधळ करणारे दारूडे हे कार्यक्रमात व्यत्यय आणणार नाहीत त्यामूळे गावातील कायदा व सूव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल व ग्रामस्थांना व महिलांना कार्यक्रमात मनमोकळेपणाने सहभागी होता येईल.