निंभोरे येथे सांगडे परिवाराने केले शिवधर्म पद्धतीने अस्थिविसर्जन

0

केम (प्रतिनिधी संजय जाधव) – निंभोरे (ता.करमाळा) येथील विजय युवराज सांगळे यांचे दिनांक 10 जुलै रोजी आकस्मित निधन झाले होते. निधनानंतर तिसऱ्या दिवशी त्यांचे अस्थि विसर्जन जुन्या रूढी परंपरांना फाटा देत अस्थी नदीत विसर्जित न करता शिवधर्म पद्धतीने वृक्षारोपणासाठी घेतलेल्या खड्ड्यात विसर्जित करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याचबरोबर त्या झाडा शेजारी वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या वृक्षांचे रोपण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

विविजय सांगडे यांचे उर्वरित विधी म्हणजे दहावा दहाव्या दिवशी न घेता पाचवे दिवशी घेण्याचा निर्णय देखील यावेळी सांगडे कुटुंबाने घेतला. यावेळी कै विजय सांगडे यांचे वडील, आई, सर्व बंधू, मुले, तसेच पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, माजी आमदार नारायण आबा पाटील, प्रदीप मामा जगदाळे, नामदेवराव वाघमारे, पोपटराव वाघमारे, विष्णू वाघमारे, विलास पाटील, बासूभाई मुलानी, हिम्मत सोलनकर,मराठा सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष सचिन काळे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके,कैलास काकडे, रवी वळेकर, कांबळे सर,डॉक्टर अमोल माने, योगेश माने निंभोरे येथील पंडित वळेकर तसेच सांगडे परिवाराचे सर्व नातेवाईकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वाघोली चे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी श्रद्धांजलीपर विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!