स्वातंत्र्य दिनानिमित्त केम मधील उत्तरेश्वर मंदिरात तिरंगी सजावट - Saptahik Sandesh

स्वातंत्र्य दिनानिमित्त केम मधील उत्तरेश्वर मंदिरात तिरंगी सजावट

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थाना मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी सजावट करण्यात आली. शिवलिंगाला हिरवा,केशरी, पांढ-या रांगोळी मधुन सजविण्यात आले होते.

या मंदिरात नेहमीच विविध सणानिमित्त त्या धर्तीवर येथील शिवलिंगाला सजावट करून पुजा केली जाते हि सजावट बाळासाहेब गुरव, पुजारी सोमनाथ गुरव, कृष्णा गुरव, तुषार शिंदे यांनी केली होती. सध्या श्रावण महिना सुरू झाला असल्याने मंदिर भाविकांनी फुलून जाते.मंदिरात येणाऱ्या भाविकांनी या सजावटीचे कौतुक केले.

भाविकांच्या मनात देशप्रेम रुजवावे या हेतूने केलेली ही सजावट अतिशय उत्तम होती असे मत महंत जयंतगिरी महाराज यांनी व्यक्त करत कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!