करमाळा ते हिवरवाडी रस्त्याच्या कामाचा उद्या शुभारंभ - Saptahik Sandesh

करमाळा ते हिवरवाडी रस्त्याच्या कामाचा उद्या शुभारंभ

संग्रहित छायाचित्र

करमाळा (दि.२०) : वर्षानुवर्षी रखडलेल्या करमाळा-हिवरवाडी या दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ उद्या शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन होणार आहे.

करमाळा-हिवरवाडी हा रस्ता स्व. दिगंबरराव बागल यांच्या कार्यकाळात सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर याची डागडुजी केली गेली नाही. करमाळा-हिवरवाडीच्या खराब रस्त्याचा फटका हिवरवाडी,भोसे वडगाव (दक्षिण) या तिन्ही गावातील नागरिकांना होत आहे. या तिन्ही गावांतून सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षणासाठी करमाळा शहरात येतात.  तिन्ही गावांतील नागरिकांनी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सदर रस्त्यासाठी तिन्ही गावांतील विद्यार्थ्यांश नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. शासनाकडून निधी मिळवून देण्याचे प्रशासनाने आश्वासन दिले होते. परंतु निधी कधी मिळणार याची शाश्वती नसल्याने लोकवर्गनीतून ह्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले.

करमाळा-हिवरवाडी रस्त्याची मागच्या पावसाळ्यात झालेली दुर्दशा

मध्यंतरी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे स्वतःच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या फंडातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याला 50 लाख रुपये मंजूर करून घेतले. नंतर लोकसभेच्या आचारसंहितेचे काम अडकले होते. आता या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!