जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ उपविजेता - Saptahik Sandesh

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ उपविजेता

करमाळा (दि.२१) –   करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या 19 वर्षीय मुली संघाने तालुका स्तरावर कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सांगोला या संघाबरोबर फायनल अटीतटीच्या सामन्यांमध्ये 1 गुणाने उपविजेतेपद मिळविले.

या यशस्वी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन प्रा. दिपक ठोसर , शारीरिक शिक्षक प्रा. राम काळे , प्रा.संध्या बिले, प्रा. सुरेखा जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील , उपप्राचार्य संभाजी किर्दाक ,वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!