करमाळा तालुक्यात आळजापूर व हिवरे येथील नूतन पोस्ट कार्यालयांचे उद्घाटन

करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात एकूण २१ नवीन पोस्ट कार्यालयांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी करमाळा तालुक्यातील आळजापूर व हिवरे येथील नूतन पोस्ट कार्यालयांचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.


या उद्घाटन कार्यक्रमास पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष अमरजीत साळुंके, जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, भरतरीनाथ अभंग, आळजापूरचे सरपंच संजय रोडे, हिवरेचे सरपंच दत्तात्रय घाडगे, उपसरपंच अतुल फरतडे, हरिश्चंद्र पाटील, आदिनाथचे संचालक डॉ. अमोल घाडगे, देवानंद बागल आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावात नव्याने सुरू झालेल्या पोस्ट कार्यालयामार्फत बँकिंग, कुरिअर, विमा सुरक्षा व इतर विविध सेवांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पोस्ट सेवेबाबत नागरिकांनी विश्वास ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बाळासो पवार, ॲड. प्रशांत बागल, शिवाजी पाटील, सुदर्शन तळेकर, आबासाहेब टापरे, हनुमंत पाटील, महेश पाटील, मच्छिंद्र रोडे, शिवाजी जाधव, अमोल जाधव, नानासाहेब मगर, विजय विटूकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

