करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ६१.९२ टक्के मतदान

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आज साधारणत: ६१.९२ टक्के मतदान झाले आहे. यानुसार वीट गटात सर्वात जास्त २३ हजार १९ मतदान झाले असून सर्वात कमी चिखलठाण गटात १९ हजार ३५२ इतके मतदान झाले आहे. आज सकाळ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी गर्दी केली होती. दिवसभर शांततेत व उत्साहात मतदान झाले आहे. हे मतदान कमी झाले आहे.

पांडे गटामध्ये २२ हजार ९५९, वीट गटात २३ हजार १९, कोर्टी गटात २२ हजार ३१२, चिखलठाण गटात १९ हजार ३५२, वांगी गटात १९ हजार ६५५ तर केम गटात २१ हजार ५१९ इतके मतदान झाले आहे.

सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ६.१४ टक्के, साडेअकरा वाजेपर्यंत १८.३६, दुपारी दीड वाजेपर्यंत ३०.९२, साडेतीन पर्यंत ४३.९९ तर साडेपाच पर्यंत ६१.९२ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी २ लाख ८ हजार २३ मतदार होते. त्यापैकी १ लाख २८ हजार ८१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल करंडे यांनी योग्य नियोजन केले होते. तर या निवडणुकीसाठी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे हे मतदान शांततेत झाले.

केम येथील ज्येष्ठ मतदार जनार्दन विठ्ठल तर्कसे यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी नातू ऋग्वेदसोबत मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!