पोथरे केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन -

पोथरे केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१३: पोथरे  येथील जिल्हा परिषद शाळेत विदर्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते . नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांतर्गत पोथरे ग्रामस्थ व पालकांकडून *14350* रु. रोख बक्षीसाची रक्कम शाळेला प्राप्त झाली होती . त्यातून या स्नेहभोजनाचा खर्च करण्यात आला .

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ . मनिषा शिंदे, उपाध्यक्ष श्री . राजेंद्र झिंजाडे  व सर्व सन्माननीय सदस्य आवर्जून उपस्थित होते .
    दुपारी 1.30 वाजता विद्यार्थ्यांनी मिसळपावचा मनसोक्त आस्वाद घेतला. पोथरे शाळेमधे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर  त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेहमीच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जातात, शाळेचे  मुख्याध्यापक  शकुर शेख,  उपक्रमशील शिक्षक बापूराव रोकडे ,  लहू जाधव,सौ . शगुफ्ता शेख , श्रीम. शाबिरा मुलाणी , श्रीम. राजश्री सावंत  यांच्या समन्वयातून शाळेत विद्यार्थी हीतास विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा ही आमच्या गावचा अभिमान आहे अशा शब्दांत शाळा व्यवस्थापन समिती , पोथरे ग्रामस्थ व पालकांनी शाळेचे विशेष कौतुक केले आणि शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना आमची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिल असे अभिवचन दिले .

शाळेमधे शैक्षणिक विकास व व्यक्तिमत्व विकासासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम, टॅलेंट हंट स्पर्धेमधे विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीपर्यंत मारलेली मजल, नुकताच शाळेच्या मेन गेट वर भव्य आणि आकर्षक स्वरूपात बसवलेला शाळेच्या नावाचा बोर्ड, मुलांच्या शौचालयासाठी करण्यात आलेली पाईपलाईन व पाण्याची सोय, क्रिडांगणाची स्वच्छता, किरकोळ दुरुस्तीची कामे , नुकताच घेतलेला विद्यार्थ्यांचा आनंदबाजार  , अंगणवाडी शेजारच्या इयत्ता चौथीच्या वर्गात करण्यात येणारी लाईट व फॅनची सोय  या सर्व सुविधा करण्यासाठी शाळेला ग्रामपंचायत पोथरे, शाळा व्यवस्थापन समिती,  पालकवर्ग यांचे सहकार्य मिळत असल्याने आणि  त्यांनी शाळेवर टाकलेल्या विश्वासामुळे आम्हा शिक्षकांना शाळेचा विकास साधण्यास भरपूर पाठबळ मिळत आहे आणि याचा फायदा शाळेच्या पटसंख्या वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होत असल्याचे मत मुख्याध्यापक  शकुर शेख यांनी व्यक्त केले .
     पोथरे शाळेत होत असलेल्या उत्कृष्ट कामकाजाबाबत  गटशिक्षणाधिकारी  नितीन कदम विस्ताराधिकारी  मिनीनाथ टकले व श्री. जयवंत नलवडे , केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे यांनी शाळेचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!