उपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा- ग्राहक पंचायतीची मागणी

करमाळा संदेश/प्रतिनिधी
करमाळा, ता.१७ : करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविधउपजिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करा- ग्राहक पंचायतीची मागणी त्रुटी तात्काळ दूर करण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केले.

उपजिल्हा रुग्णालयात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून रुग्णांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा अभाव, स्वच्छतेच्या समस्या तसेच काही विभागांतील मनुष्यबळ अपुरे असल्याने सेवा प्रभावीपणे देता येत नसल्याची तक्रार करण्यात आली.
शिष्टमंडळाने रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच रुग्णांना दर्जेदार आणि वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल डुकरे , शल्यचिकित्सक डॉ. स्मिता बंडगर व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांनी निवेदन स्वीकारून मांडलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.



शिष्टमंडळात अखील भारतीय ग्राहक पंचायत महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधुरीताई परदेशी,तालुका सचिव अझीम खान, कार्यकारी सदस्य संजय हंडे, शिवाजी वीर व भिष्माचार्य चांदणे आदींचा समावेश होता.
