'महाशिवरात्री' निमित्ताने करमाळा शहरातील 'शिवझुंज' मित्र मंडळाचा अभिषेक व महाप्रसाद सोहळा उत्साहात संपन्न.. -

‘महाशिवरात्री’ निमित्ताने करमाळा शहरातील ‘शिवझुंज’ मित्र मंडळाचा अभिषेक व महाप्रसाद सोहळा उत्साहात संपन्न..

0

करमाळा : करमाळा शहरातील कोठावळेश्वर महाराज मंदिरात ‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने वीर चौक येथील शिवझुंज मित्र मंडळ यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पहाटे शिवझुंज मित्र मंडळाच्या वतीने भगवान शंकराची विधिवत महादेव अभिषेक पूजा पार पडली. याप्रसंगी भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.

सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी करमाळा शहरातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले. यावेळी अनेक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमात शिवझुंज मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने व एकजुटीने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. नियोजनबद्ध व्यवस्था, भाविकांची सोय आणि शिस्तबद्ध आयोजन यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने करमाळा शहरात सर्वत्र भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच सामाजिक व धार्मिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!