एनएमएमएस परीक्षेत श्री उत्तरेश्वर हायस्कूलचे घवघवीत यश; २९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड

केम(संजय जाधव): राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) २०२५–२६ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील एकूण २९ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.

यामध्ये गुणांच्या क्रमाने पुढील विद्यार्थी आघाडीवर आहेत :
१) कु. महेक निसार झारेकरी – १३६ गुण
२) कु. कीर्ती गंगाधर कुंभार – १२४ गुण
३) कु. शर्वरी विनोद तळेकर – ११३ गुण
४) कु. आकांक्षा अनिल तळेकर – १०३ गुण
५) तेजस उत्तरेश्वर नरखेडकर – १०२ गुण

या विद्यार्थ्यांना एस. एम. पोतदार, टी. व्ही. पवार, बी. व्ही. सांगवीकर व एम. बी. हिरवे यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य एम. डी. बेले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

