एकनाथ षष्ठीनिमित्त श्री उत्तरेश्वर मंदिरात द्राक्षांची आकर्षक आरास -

एकनाथ षष्ठीनिमित्त श्री उत्तरेश्वर मंदिरात द्राक्षांची आकर्षक आरास

0

केम(संजय जाधव): एकनाथ षष्ठी निमित्त केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली. स्थानिक द्राक्ष बागायतदारांनी दिलेल्या द्राक्षांपासून शिवलिंगाला सुंदर माळा तयार करून ही आरास करण्यात आली.



ही आरास कृष्णा गुरव, तात्या गुरव व कंदरकर यांनी केली. द्राक्षांच्या माळांनी सजविलेल्या शिवलिंगाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.

मंदिरात आलेल्या भाविकांना या आरासमुळे शिवलिंगाचे आकर्षक व प्रसन्न रूप पाहायला मिळत असून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या मंदिरात दर सोमवारी तसेच विविध सणांच्या निमित्ताने शिवलिंगाची वेगवेगळ्या प्रकारे आरास केली जाते. एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने द्राक्षांची ही विशेष आरास करण्यात आली होती. ही आरास पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मन प्रसन्न झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!