“आप्पाच्या करामती” फेम प्रशांत तकीक यांचा ‘आप्पाश्री' गावरान मिसळ ॲन्ड साउथ इंडियन’ हॉटेलचा उद्या भव्य शुभारंभ.. -

“आप्पाच्या करामती” फेम प्रशांत तकीक यांचा ‘आप्पाश्री’ गावरान मिसळ ॲन्ड साउथ इंडियन’ हॉटेलचा उद्या भव्य शुभारंभ..

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोशल मीडियावर “आप्पाच्या करामती” या रील्समुळे लोकप्रिय झालेले प्रशांत तकीक आता खाद्यव्यवसायात पदार्पण करत आहेत. त्यांच्या ‘आप्पा श्री गावरान मिसळ ॲन्ड साउथ इंडियन’ या नव्या हॉटेलचा भव्य शुभारंभ उद्या शनिवार, दिनांक 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जेऊर टेंभुर्णी रस्त्यावर, आदिनाथ कारखान्याजवळ संपन्न होणार आहे.


या हॉटेलचे उद्घाटन प्रशांत तकीक यांचे आई-वडील तसेच मनोहर भोसले यांच्या हस्ते होणार असून, या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजय मामा शिंदे, भाजपा युवा नेते दिग्विजय बागल, गणेश भाऊ चिवटे, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील, माजी सभापती अतुल भाऊ पाटील, बाजार समिती संचालक शंभूराजे जगताप, पंचायत समिती सदस्य सोनाली ताई तकीक, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास सातव, उदय देशमुख, शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे, ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. डाॅ.बाबूराव हिरडे, माजी सभापती लक्ष्मण महाडिक, प्रगतशील बागायतदार दिलीप ढाणे, ज्योतीराम नरोटे, सतीश चौधरी, गणेश जाधव, विशाल करंडे, संजय दादा गलांडे, लोकविकासचे दीपक आबा देशमुख, डॉ. प्रशांत म्हाकले, बाळनाथ रणसिंग आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

“आप्पाच्या करामती” या रील्समुळे घराघरात पोहोचलेले प्रशांत तकीक यांचे हे नवीन व्यावसायिक पाऊल असल्याने या उद् घाटन सोहळ्याबाबत जिल्ह्यासह राज्यभरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!