करमाळा तालुका व  उजनी परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी मोफत जाळी व मासे पकडण्याचे किट मोफत देणार- संजय गुटाळ -

करमाळा तालुका व  उजनी परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी मोफत जाळी व मासे पकडण्याचे किट मोफत देणार- संजय गुटाळ

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१०:करमाळा तालुका व  उजनी परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास विभागाच्या वतीने गरजू मच्छीमारांना मोफत जाळी व मच्छी मासे पकडण्याचे किट मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजुनी माझ्याशी संपर्क करावा,  असे आवाहन शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी प्रशासकीय संचालक (आजिनाथ कारखाना) चे संजय गुटाळ यांनी सांगितले.

जादा माहिती देताना ते म्हणाले की,  येत्या 23 जून रोजी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार असून मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारी जाळी तसेच मासे पकडण्याचे किटची सुविधा पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मच्छीमारांनी तातडीने साधा अर्ज करून नोंदणी करावी व अधिक माहितीसाठी माझ्या 8600615555 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


यासोबतच शिवनेरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून गेल्या वर्षी करमाळा येथील एकलव्य आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कंपास व मिनी बॉक्सचे वाटप करण्यात आले होते, तर यावर्षी वांगी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व गावांतील जि.प.शाळांमध्ये सुमारे 2000 टिफिन बॉक्सचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती श्री. गुटाळ यांनी दिली. तसेच स्वर्गीय हरिनाना  रोकडे यांच्या पुण्यस्मरणार्थ गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून दरवर्षी 250 पेक्षा अधिक रक्तदाते या उपक्रमात सहभागी होत असल्याने सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
दरम्यान, शहरातील मच्छीमारांना सध्या रस्त्यावर बसून मासेविक्री करावी लागत असल्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कायमस्वरूपी मच्छीमार विक्री केंद्र (गाळे) उभारण्याबाबत आपण प्रयत्न करणार  असल्याचेही श्री. गुटाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मच्छीमार व्यवसायाला बळ मिळण्यासोबतच त्यांचा सन्मानही वाढणार असून या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी मच्छीमारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!