करमाळ्यातील स्वराली EV चार्जिंग स्टेशनला राज्यस्तरीय सन्मान -

करमाळ्यातील स्वराली EV चार्जिंग स्टेशनला राज्यस्तरीय सन्मान

0

करमाळा : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या निकोल  ईव्ही या नामांकित कंपनीतर्फे दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला “फ्रँचायझी पार्टनर समिट 2026” हा भव्य कार्यक्रम 14 मार्च 2026 रोजी रॅडिसन ब्लू, हिंजवडी (पुणे) येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यभरातून सुमारे 350 फ्रँचायझी पार्टनर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

यावेळी करमाळा येथील स्वराली EV चार्जिंग स्टेशनने उल्लेखनीय कार्य करत ग्रामीण भागात उभारलेल्या उत्कृष्ट पायाभूत सुविधांबद्दल त्यांना “BEST INFRA RURAL AWARD 2026” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव तसेच कंपनीचे प्रमुख अर्जुन पवार यांच्या हस्ते स्वराली EV चार्जिंग स्टेशनच्या प्रोप्रायटर सौ. रेशमा विजयकुमार जाधव यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना सौ. रेशमा जाधव यांनी मनोगत व्यक्त करत, सध्याच्या काळात पर्यावरण संरक्षणासाठी आणि आर्थिक बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर अत्यंत गरजेचा असल्याचे प्रभावीपणे मांडले. ग्रामीण भागातही EV पायाभूत सुविधा उभारून हरित भविष्य घडविण्याचा आपला प्रयत्न कायम राहील, असे त्यांनी सांगितले.

या सन्मानामुळे करमाळा तालुक्याच्या नावात मानाचा तुरा रोवला गेला असून, स्थानिक स्तरावरूनही इलेक्ट्रिक वाहन क्रांतीत मोठे योगदान दिले जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!