केम येथे २८ मार्चला विराट हिंदू संमेलनाचे आयोजन -

केम येथे २८ मार्चला विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवार, २८ मार्च रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशंभू वेसीजवळ सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

या संमेलनासाठी ह.भ.प. लिंबाजी तिडके महाराज (परळीकर), महेश केदार (प्रस्थापना प्रमुख, हिंदू पुनरुत्थान सभा) तसेच श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत. या वेळी हिंदू जनजागृतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!