“रस्त्याच्या मध्यभागी कार उभी- वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल -

“रस्त्याच्या मध्यभागी कार उभी- वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा, ता.४: शहरातील पंजाबवस्ताद चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी कार उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी करमाळा पोलिसांनी एका चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस कर्मचारी बापुसाहेब कोकाटे, हिंगमिरे व शिंदे हे शहरात नियमित पेट्रोलिंग करत असताना पंजाबवस्ताद चौक येथे मारुती कंपनीची इको कार (क्र. MH 11 DH 7867) रस्त्याच्या मध्यभागी उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता तसेच अपघाताचा धोका देखील निर्माण झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ चौकशी केली असता, संबंधित वाहनचालकाचे नाव इमराण माजिद झारेकरी (वय २६, रा. मौलाली नगर, करमाळा) असे आहे, त्यांच्याविरुद्ध  करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!