ऊत्तरेश्वर देवस्थान येथे केदारनाथ शिवलिंगाची आकर्षक आरास

0

केम(संजय जाधव):सोमवार निमित्त येथील जागृत ग्रामदैवत श्रऊत्तरेश्वर देवस्थान येथे केदारनाथ शिवलिंगाची आकर्षक आरासी ऊत्तरेश्वर देवस्थान येथे केदारनाथ शिवलिंगाची आकर्षक आरास करून विशेष पूजा करण्यात आली. या आरासेसाठी बर्फाचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे शिवलिंगाचे रूप अधिकच देखणे आणि भाविकांना भावणारे दिसून आले.

ही सुंदर आरास कृष्णा गुरव, तात्या गुरव आणि बळी गुरव यांनी साकारली. आरास पाहण्यासाठी मंदिरात आलेल्या भाविकांनी मनमोहक रूपाचे दर्शन घेत समाधान व्यक्त केले.

मंदिरात सोमवारी तसेच विविध सणांच्या निमित्ताने शिवलिंगाची वेगवेगळ्या स्वरूपात आरास केली जाते. त्याच परंपरेनुसार यावेळी केदारनाथ स्वरूपातील आरास करण्यात आली होती. ही आरास पाहून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मन प्रसन्न झाल्याची भावना ऊत्तरेश्वर टोंपे आणि दादा नवले यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!