उत्तरेश्वर मंदिरात शिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

0

केम (संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात हिंदू नववर्षापासून दर महिन्याला शिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवार दि. १५ मे रोजी शिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

सकाळी अभिषेक व पिंडलेपन

शिवरात्रीनिमित्त सकाळी ८ वाजता श्रींचा अभिषेक व पिंडलेपन सोहळा संजय नवले व गणेश दादा नवले भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आला.

ह.भ.प. सुखदेव ननवरे महाराज यांचे कीर्तन

सायंकाळी ८ ते ११ या वेळेत ह.भ.प. सुखदेव ननवरे महाराज (जालालपूर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांना गायनाचार्य ह.भ.प. भाऊसाहेब पालवे, ह.भ.प. सोमनाथ राऊत, मृदंगाचार्य संतोष भोसले, गुंडा महाराज निंबाळकर आदींची साथ लाभली. कीर्तनादरम्यान पखवाजाची जुगलबंदी विशेष आकर्षण ठरली.

अभंगातून भाविक मंत्रमुग्ध

ह.भ.प. ननवरे महाराज यांनी “सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जिथे…तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी…” या अभंगावर अत्यंत सुंदर निरूपण केले. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा आनंद घेतला.

महाप्रसादाचे आयोजन

कीर्तनानंतर भगवान शंकराची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना संजय नवले व गणेश नवले यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!