कुंभारगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा- ११ जणांना पकडले रंगेहात- दोन लाखाचा जप्त केला मुद्देमाल -

कुंभारगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा- ११ जणांना पकडले रंगेहात- दोन लाखाचा जप्त केला मुद्देमाल

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२७:  कुंभारगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करमाळा पोलिसांनी छापा टाकून ११ जणांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने व जुगार साहित्य असा एकूण सुमारे ₹2,02,840/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 26 मे 2026 रोजी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजे कुंभारगाव ता. करमाळा येथील बाळासाहेब देवराम आढाव यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली काही इसम  पैशावर जुगार खेळत आहेत.

सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेत छापा टाकला, त्यावेळी  पोलिसांनी ₹1,840/- रोख रक्कम, 52 पत्त्यांचा डाव, आकडेमोड केलेला कागद, विविध कंपन्यांच्या पाच दुचाकी वाहने तसेच रेडमी, सॅमसंग, विवो व रियलमी कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण ₹2,02,840/- किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.

या प्रकरणी  1) दिपक जालिंदर पोळ वय 30 वर्षे 2) रामचंद्र पांडुरंग सांळुखे वय 37 वर्षे 3) शिवाजी आप्पा पोळ वय 59 वर्षे 4) रामदास भानुदास पानसरे वय 65 वर्षे 5) केशव दत्तु भोसले वय 65 वर्षे 6) रामदास पोपट पोळ वय 45 वर्षे 7) यमाजी पोपट सोनवने वय-55 वर्षे 8) महादेव शिवराम पोळ वय 59 वर्षे 9) सत्यवान अजिनाथ भालेराव वय 40) वर्षे 10) नागेश कुंडलीक पोळ वय 30 वर्षे 11) ऋषीकेश रामदास कणसे वय 28 वर्ष सर्व रा.कुंभारगाव, ता.करमाळा
या ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!