शेटफळ येथील जलसाबाई पोळ यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२७: शेटफळ (ता. करमाळा) येथील ज्येष्ठ नागरिक जलसाबाई भागवत पोळ (वय ९३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या शेटफळ येथील प्रगतशील शेतकरी वसंत पोळ यांच्या मातोश्री होत्या. तसेच मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक किरण पोळ व उद्योजक वैभव पोळ यांच्या त्या आजी होत.
अत्यंत प्रेमळ, कुटुंबवत्सल आणि साध्या स्वभावामुळे जलसाबाई पोळ यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबासह समाजातही आपुलकीचे नाते जपले होते. त्यांच्या निधनाने पोळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
