करमाळ्यात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी -

करमाळ्यात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

0

करमाळा (दि.२९) : करमाळा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात ईद-उल-अजहा (बकरी ईद) उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. करमाळा शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहत नमाज अदा केली.

यावेळी नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले, तर खुतबा पठण शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले. काझी घराण्याकडून ही परंपरा शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू असून, यासंदर्भातील नोंदी सरकारी अभिलेखांमध्ये असल्याचा दावा करण्यात आला.

सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त
काही राजकीय घटक आणि वृत्तवाहिन्यांमुळे समाजात द्वेषाचे वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केला. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने सतर्क राहून योग्य कारवाई करावी,  त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने मॉब लिंचिंगविरोधी कठोर कायदा आणावा, अशी मागणी शहर काझी यांनी केली. या प्रकारांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत भाष्य करताना शहर काझी यांनी अमेरिका इस्त्राईल युद्ध्याबाबत तीव्र भूमिका व्यक्त केली. तसेच भारतीय जवानांच्या बलिदानाचा उल्लेख करत “जय जवान, जय किसान, हिंदुस्तान जिंदाबाद” असा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!