सातोली येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

0

केम(संजय जाधव): सातोली (ता. करमाळा) येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

सायंकाळी डीजेच्या तालावर शोभिवंत रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव केला.

यावेळी दीपक फरतडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजचा तरुण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जीवनात आदर्श आचरण स्वीकारण्याची गरज आहे. महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असून, त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी गावातील युवक नेते अण्णासाहेब गावडे, सचिन पाडसे, दत्तात्रय वाघ, तात्या वाघ, अमर साळुंखे, गणेश पाडसे यांच्यासह सातोली गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!