उत्तरेश्वर देवस्थानात आंब्याचा रसाची व बिस्किटांची आकर्षक आरास

0

केम(संजय जाधव): केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान येथे सोमवार निमित्त शिवलिंगास आंब्याच्या रसाची व बिस्किटांची आकर्षक आरास करण्यात आली. मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या या अनोख्या आरासीकडे भाविकांचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले.

सोमवारच्या निमित्ताने करण्यात आलेली ही आरास कृष्णा गुरव, तात्या गुरव व शिवाजी जाधव यांनी साकारली. शिवलिंगाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली. आरास पाहून भाविकांनी समाधान व्यक्त करत मंदिरातील वातावरण भक्तिमय व प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली.

मंदिरात दर सोमवारी तसेच विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने शिवलिंगास वेगवेगळ्या स्वरूपात आकर्षक आरास केली जाते. त्याच परंपरेनुसार यावेळी आंब्याच्या रसाची व बिस्किटांची विशेष आरास करण्यात आली.

“मंदिरात दर सोमवारी विविध प्रकारची आरास केली जाते. यावेळी आंब्याच्या रसाची व बिस्किटांची आरास पाहून मन प्रसन्न झाले. दर्शनासाठी आल्यानंतर भक्तीमय वातावरणाचा अनुभव आला,” – दत्तात्रय कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!