७ ते १४ जूनदरम्यान केममध्ये अखंड हरिनाम सप्ताह -

७ ते १४ जूनदरम्यान केममध्ये अखंड हरिनाम सप्ताह

0
संग्रहित छायाचित्र

केम(संजय जाधव): केम (ता.करमाळा)येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात अधिक मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन दि. ७ जून ते १४ जून या कालावधीत करण्यात आले आहे.

सप्ताहाची सुरुवात आज दिनांक ७ जून पासून ध्वजपूजन व ग्रंथपूजनाने झाली. ध्वजपूजन महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते, तर ग्रंथपूजन चेअरमन दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ५ काकड आरती, सकाळी ७ ते ८ श्रींचा अभिषेक, सकाळी ८ ते ९ चहा-नाश्ता, सकाळी ९ ते १२ श्रीमद् भागवत कथा, दुपारी १२ ते २ महाप्रसाद, दुपारी २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते ९ भोजन, रात्री ९ ते १२ हरिकीर्तन आणि रात्री १२ ते २ हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


श्रीमद् भागवत कथेचे निरूपण ह.भ.प. रविंद्रजी परेराव महाराज करणार आहेत. त्यांना तबलावादनासाठी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज, ऑर्गनवादनासाठी ह.भ.प. भूषण महाराज, गायनाचार्य ह.भ.प. रघुनाथ महाराज तसेच मृदंगाचार्य गजानन महाराज यांची साथ लाभणार आहे. याशिवाय कृष्णा महाराज, तुषार महाराज, निवृत्ती महाराज व अविनाश महाराज हेही सहभागी होणार आहेत.

कीर्तनासाठी गायनाचार्य शरद महाराज, सुभाष महाजन, नागेश महाराज, राहुल महाराज, निवृत्ती महाराज, तानाजी महाराज आणि रघुनाथ पाटील यांची साथ राहणार आहे. सप्ताहादरम्यान रात्री ९ ते १२ या वेळेत ह.भ.प. गणेश महाराज, दत्ता महाराज, निवृत्ती महाराज, अभंग महाराज, अभिमान महाराज, मोहन महाराज आणि संदीप महाराज यांची कीर्तने होणार आहेत.

सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार असून दि. १४ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. रविंद्रजी परेराव महाराज यांचे कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात येणार असून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

या धार्मिक सोहळ्याचा लाभ केम व पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व केम ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!