करमाळ्यात गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद-एचडीएफसी व गुरुकृपा फायनान्शिअल सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम -

करमाळ्यात गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद-एचडीएफसी व गुरुकृपा फायनान्शिअल सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.६: आर्थिक नियोजन आणि सुरक्षित गुंतवणुकीबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने करमाळा येथील हॉटेल विश्वजीत येथे “गुंतवणूक विषयी जागरूकता” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम करमाळा तालुक्यातील निंभोरे गावचे सुपुत्र तथा सध्या पुणे येथे म्युच्युअल फंड वितरक म्हणून कार्यरत असलेले गुरुकृपा फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संस्थापक केशव साहेबराव काळदाते यांनी एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनीचे कोल्हापूर विभागाचे मुख्य विक्री अधिकारी सुनील जाधव हे होते.

यावेळी बदलत्या आर्थिक परिस्थितीत योग्य नियोजनाचे महत्त्व आहे. बाँड, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, पीपीएफ, स्थावर मालमत्ता (प्रॉपर्टी), म्युच्युअल फंड, शेअर बाजार, फिक्स डिपॉझिट आणि सोने (गोल्ड) या विविध गुंतवणूक पर्यायांचे फायदे-तोटे, जोखीम आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनातील महत्त्व यावर अभ्यासपूर्ण विवेचन करण्यात आले. विशेषतः म्युच्युअल फंडाविषयी असलेल्या अनेक गैरसमजुती दूर करत या माध्यमातून शिस्तबद्ध गुंतवणूक कशी करता येते, याची माहिती श्री. जाधव यांनी दिली. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

यावेळी आयोजक केशव काळदाते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पुणे येथे प्रामाणिकपणे आर्थिक नियोजनाचे काम करत असताना अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. शहरातील लोकांप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांनाही योग्य आर्थिक मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या कष्टाच्या पैशाची फसवणूक होऊ नये, भविष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि करमाळा तालुक्यात आर्थिक साक्षरता वाढावी, या सामाजिक उद्देशातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!