आनंदी साठेच्या वाढदिवसानिमित्त पोथरे केंद्रशाळेत शालेय साहित्य वाटप

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा : कु.आनंदी साठे हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, पोथरे येथे…


करमाळा/संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कु.आनंदी साठे हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, पोथरे येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा अजित साठे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मनीषा साठे यांनी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनावे, तसेच समाजातील चांगल्या गुणांचा स्वीकार करून आई-वडील, गुरुजन व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


या कार्यक्रमात मनीषा साठे, संजीवनी साठे, अभिज्ञा साठे, आनंदी साठे व मिताली इवरे उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने मनीषा साठे व संजीवनी साठे यांचा सत्कार करण्यात आला, तर वाढदिवसानिमित्त आनंदी साठे हिला विद्यार्थिनींकडून भेटवस्तू देण्यात आली. मुख्याध्यापक हनुमंत जाधव यांनी स्वागत केले. शकूर शेख यांनी सूत्रसंचालन, तर लहू जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाबिरा मुलाणी व राजश्री सावंत यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!