करमाळ्यात उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी - Saptahik Sandesh

करमाळ्यात उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा :  करमाळ्यात जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त करमाळा शहरातील राजे उमाजी नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने सनई-वाद्यांच्या गजरात, घोड्यांसह आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.


मिरवणुकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सनई-वाद्यांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मिरवणुकीचा समारोप अथर्व मंगल कार्यालय येथे करण्यात आला.

यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे म्हणाले की, करमाळा तालुक्यात जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने सामाजिक सलोखा राखत दरवर्षी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी केली जाते. जयंतीच्या माध्यमातून समाजबांधवांनी व्यसन, लबाडी आणि चोरीपासून दूर राहण्याची तसेच यापुढील जयंती उत्सवात भंडारा पायदळी तुडवला जाणार नाही, अशी शपथ घेतली.

वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजबांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आर्थिक मदत व निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही शितोळे यांनी सांगितले. युवकांनी छोटे-मोठे उद्योग सुरू करून स्वावलंबी उद्योजक बनावे. तसेच गाव-खेड्यांपासून तालुका व शहर पातळीपर्यंत जय मल्हार क्रांती संघटनेचे संघटन अधिक मजबूत व व्यापक करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे करमाळा तालुका पदाधिकारी आणि समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले.. प्रस्ताविक डॉ.भैरवनाथ वाघमोडे व आभार धनंजय ढवळे यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दौलत शितोळे (राष्ट्रीय अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना), अंकुशराव जाधव महाराष्ट्र (अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना), सुधीर नाईक माजी युवक अध्यक्ष,गणेश चिवटे भाजपा  जिल्हाध्यक्ष, करमाळा पंचायत समिती सभापती पूजाताई ढेरे, भरत भाऊ अवताडे पंचायत समिती सदस्य, चंदूकाका सरडे पंचायत समिती सदस्य, अंगद देवकते जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय समाज पक्ष, प्रा.सागर चव्हाण व्याख्याते, नितूताई मदणे महीला अघाडी महाराष्ट्र सरचिटणीस, प्रकाश थोरात, रेवणनाथ खंडागळे,प्रमोद वाघमोडे,अनिल थोरात, शुभम बंडगर युवा तालुका अध्यक्ष भाजपा,नितीन खटके, आफसर जाधव, रामभाऊ ढाणे, दत्ताभाऊ चव्हाण, राहुल भैय्या मदणे माढा तालुका अध्यक्ष, डॉ.समाधान कोळेकर, बापूसाहेब ढवळे यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!