सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानदेव खारगे यांचे निधन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१५: येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश ज्ञानदेव खारगे (वय ७९) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने खारगे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सुरेश खारगे यांना दादा या नावाने संबोधीत होते. ते संयमी, मनमिळाऊ व अजातशत्रु होते.करमाळा नगरपालिकेतील कर्मचारी प्रशांत खारगे, करमाळा एस.टी. आगारातील चालक सुशांत खारगे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक निशांत खारगे यांचे ते वडील होत.
त्यांच्यावर करमाळा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
