कापड व्यावसायिक प्रदीप वासकर यांचे निधन - Saptahik Sandesh

कापड व्यावसायिक प्रदीप वासकर यांचे निधन

केम (संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील कापड व्यावसायिक प्रदीप शिवमूर्ती वासकर (वय ६९) यांचे २३ ऑक्टोबरला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

केम परिसरातील ग्राहकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सोंगाच्या गाड्यातील भीमाच्या भूमिकेमुळे ते विशेष परिचित होते. भीमाच्या भूमिकेतून त्यांनी सादर केलेली भाषणे परिसरात गाजली होती. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!