गणेशोत्सवातून विधवा भगिनींना सन्मान देण्याचे आवाहन - Saptahik Sandesh

गणेशोत्सवातून विधवा भगिनींना सन्मान देण्याचे आवाहन

प्रमोद झिंजाडे

करमाळा (प्रतिनिधी): गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकतेचा आणि समाजप्रबोधनाचा उत्सव व्हावा, या उद्देशाने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त विधवा महिलांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्या हस्ते आरती व गौरीपूजन करण्याचे आवाहन विधवा महिला सन्मान चळवळीचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी केले आहे

झिंजाडे यांनी  केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, महाराष्ट्रासह भारतातील अनेक कुटुंबांमध्ये विधवा महिलांना आजही धार्मिक व सामाजिक कार्यापासून दूर ठेवले जाते. ही मानसिकता बदलून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.

गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी, सार्वजनिक मंडळे, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. यावेळी किमान एकदा  विधवा महिलेच्या हस्ते आरती करून त्यांना सन्मान द्यावा. १८ सप्टेंबर २०२६ रोजी गौरीपूजन व महाप्रसादाच्या दिवशी विधवा महिलेच्या हस्ते गौरीपूजन व विधी करून त्यांना आदराचे स्थान द्यावे. या उपक्रमाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरती किंवा गौरीपूजनाचा छोटा व्हिडिओ तयार करून 9607089640 या संपर्क क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!