संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१५:संगोबा येथील संगमेश्वर विद्यालयाचे   मुख्याध्यापक सुनिल शिंदे दुसरा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, संस्थेचे अध्यक्ष बी. पी. रोंगे-पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या पुरस्कार वितरण समारंभास पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक संघाचे निमंत्रक सुभाष माने, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजीराव माने, सचिव बापूराव निळ, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


मुख्याध्यापक सुनिल शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत शाळेच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा दिली आहे. तसेच शालेय परिसराचे सुशोभीकरण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि क्रीडा क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देत त्यांनी संगमेश्वर विद्यालयाचा लौकिक वाढविला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यापुरस्काराबद्दल त्यांचे अनेकानी अभिनंदन केले, विशेषत: ग्रामसुधार समितीच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!