केम येथील बागायतदार महादेव तळेकर यांचे निधन

केम(संजय जाधव): केम येथील बागायतदार महादेव लिंबराज तळेकर यांचे हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८१ होते. ते खंडोबा देवस्थानचे सेवेकरी होते. त्यांना बैल पोळ्यादिवशी ऊत्तरेश्वर देवस्थानच्या नंदीला वेसण घालण्याचा मान होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे
