टाकळीत साडेतीन एकर ऊस पेटवून लाखो रुपयाचे केले नुकसान

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१७ :
टाकळी (ता. करमाळा) येथील कृषी सहाय्यक सागर विलास होळकर यांच्या साडेतीन एकर क्षेत्रातील उसाचे पीक अज्ञात इसमाने आग लावून जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. ग्रामस्थांच्या मदतीने दीड एकरातील ऊस वाचवण्यात यश आले, मात्र उर्वरित साडेतीन एकरातील ऊस जळून लाखो रुपयाचे नुकसान झाले. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रणजीत माने पुढील तपास करत आहेत.


