वीटमधून मोटारसायकलची चोरी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : घरासमोर लावलेली मोटारसायकल हॅन्डल लॉक तोडून चोरट्यांनी चोरून नेली आहे. हा प्रकार २८ डिसेंबरच्या मध्यरात्री घडला आहे. त्याची फिर्याद १९ फेब्रुवारीला दिली आहे.
यात ज्ञानेश्वर रामदास खंडागळे यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी वीट येथे रहात असून २०१६ मध्ये काळ्या रंगाची डिलक्स कंपनीची मोटार सायकल खरेदी केली होती. तिचा क्र.एमएच ४५ एए ८४२६) असा होता. ही मोटारसायकल २८ डिसेंबरला मी रात्री आठ वाजता घरासमोर लावलेली होती.
२९ डिसेंबरला सकाळी मोटारसायकलचा शोध घेतला असता ती जाग्यावर आढळून आली नाही. शोध घेऊनही सापडली नाही. त्यामुळे ती चोरट्याने चोरून नेल्याचे
लक्षात आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.