१२ वी च्या परीक्षेत केमच्या नूतन महाविद्यालयाचा १००% निकाल

केम (संजय जाधव) – अभिमन्यु शिक्षण प्रसारक मंडळ केम संचलित नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयाचा यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन जी तळेकर सर यांनी दिली.
सन 2024 मध्ये विज्ञान या विभागात 108 विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण अभ्यास करताना विद्यालयांमध्ये मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडून घेतल्या जात होत्या. शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे ज्यादा तास घेऊन त्यांच्या गुणवत्ता मध्ये सुधार करण्याचा प्रयत्न येथील शिक्षकांनी केला अशी माहिती प्राचार्य सौ दिपाली ताकमोगे मॅडम यांनी दिली.
विज्ञान विभागामध्ये कुमारी पालवे प्रतीक्षा नामदेव 91.33% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाली. कुमारी वायभासे भाग्यश्री नागनाथ ही विद्यार्थ्यांनी 88.17% मिळून द्वितीय आली.कुमारी कांबळे पूजा शाहू ही विद्यार्थ्यांनी 87.50% व कुमारी पवार प्रिया हरिश्चंद्र ही विद्यार्थ्यांनी 87.50% तिसरी आली . कुमार तळेकर स्वयंभू सतीश हा विद्यार्थि 86.33 % कुमारी तळेकर गौरी रमेश 85.67% कुमार मोमीन यासीन रशीद 85.17 % गुण मिळवून पास झाला.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिमन्यु शिक्षण प्रसारक मंडळ केम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुदर्शन (बापू ) तळेकर सर सचिव भाऊसाहेब अभिमन्यू बिचितकर प्रचार्या ताकमोगे मॅडम व सर्व शिक्षक,शिक्षकेतर,कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे या काॅलेजने निकालाची परंपरा कायम राखल्याबद्ल केम व परिसरातून कौतूक होत आहे.


