करमाळा येथे ‘मुख्याध्यापक कार्यशाळा’ संपन्न
करमाळा (दि.२१) – प्राथमिक शिक्षण विभाग सोलापूर जिल्हा परिषद व करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद गुणवत्तेचा’ या कार्यक्रमा अंतर्गत ‘मुख्याध्यापक कार्यशाळा’ ही सभा आज दि.२१ रोजी संपन्न झाली. करमाळा पंचायत समितीच्या हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडला.
या सभेस प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, विस्तार अधिकारी हरीश राऊत, विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे,विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, विस्तार अधिकारी नितीन कदम यांचे उपस्थितीमध्ये सहविचार सभा संपन्न झाली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या हस्ते संपन्न झाले प्रास्ताविकामध्ये जयवंत नलवडे यांनी तालुक्याचा शैक्षणिक आढावा यावेळी सादर केला शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सखी सावित्री तक्रार पेटी विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे कौतुक करणे विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांना सूचना केल्या संतोष जगताप या शिक्षकांच्या शाळेचा पट वाढल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा परीक्षा बीएलओ कामकाज महावाचन उत्सव स्काऊट गाईड शंभर टक्के नोंदणी दिव्यांग अस्मिता अभियान जर्मन भाषा नोंदणी करणे धोकादायक खोली दुरुस्ती वर्ग खोली जलजीवन पाणी पुनर्वापर जि प शाळा मालमत्ता नोंद करणे तंबाखू मुक्त शाळा करणे शालेय पोषण आहार नवीन आदेशानुसार पाककृती तयार करणे अमृत रसोईघर या सर्व विषयांवर सखोल मार्गदर्शन करून प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आलेले असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड केले जाणार नसून शिक्षकांना सक्त सूचना दिल्या. हसत खेळत शिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये समाविष्ट होऊन शिक्षकांनी झोकून द्यावे कौतुकाची थाप विद्यार्थ्यांना द्यावी असे आवाहन केले. विद्यार्थी आधार नोंदणी शंभर टक्के करणेबाबत सूचना केल्या. शिक्षकांचे कुठलेही प्रकारचे प्रलंबित प्रश्न ठेवणार नसून शाळा सोडून जिल्हा कार्यालयास कोणीही येऊ नये अशा सक्त सूचना दिल्या . शिक्षकांच्या समस्या यावेळी जाणून घेतल्या.
राजकुमार खाडे यांनी सूत्रसंचालन केले. रमाकांत गटकळ यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सर्व केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.