करमाळ्यात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहरात मद्य प्राशन करून मोटारसायकल चालविणाऱ्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संगम चौकात रविंद्र हौसराव जाधव (रा. सिध्दार्थनगर, करमाळा) हा १ जूनला सकाळी पावणेअकरा वाजता मद्य प्राशन करून मोटारसायकल चालवत होता. त्यास पोलीसांनी पकडून तपासणी केली असता, तो मद्य पेल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे ३ जुनला दुपारी चार वाजता जामखेड चौकात कन्हैयालाल भद्रीलाल मेहेर (रा. रटलाई पुराणी टंकी के पास, झारवाड, राजस्थान) हा त्याच्या ताब्यातील मालट्रक वेडेवाकड्या स्वरूपात चालवताना आढळून आला.

त्याची तपासणी केली असता, त्याने मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ३ जुनला रात्री साडेनऊ वाजता श्रवण हिरा गुजर रा. जालखेडा, ता. हुरडा, जि. भिलवाडा) हा त्याच्या ताब्यातील मालट्रक मौलालीमाळावर वेड्यावाकड्या स्वरूपात चालवताना आढळून आला. त्यास पकडून त्याची तपासणी केली असता, मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. हि कारवाई पोलीस निरीक्षक श्री.घुगे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरिक्षक श्री.माहूरकर, पोलीस हवालदार सचिन हिंगमिरे, पोलीस हवालदार दिपक कांबळे, पोलीस हवालदार मयूर कदम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!