करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आजिनाथ पाटील यांचे निधन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : बिटरगावं वा (ता.करमाळा) येथील अजिनाथ शंकरराव पाटील (नाना) ( वय ९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे ४ मुले ३ मुली व सुना नातवंडे असा परिवार आहे.
आजिनाथ पाटील यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती १९६७ ते १९७२ दरम्यान उपसभापती भूषवले.तसेच बिटरगावं वा चे सरपंच व खरेदी विक्री संघाचे संचालक व बिटरगाव सोसायटी चे चेयरमन अशा विविध पदावर काम केले.शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ शिक्षक नंतर पोलीस पाटील पदी काम केले. या अष्टपैलू व्यक्तीमत्वच्या जाण्याने या भागावर शोककळा पसरली आहे. तसेच ते देशभक्त नामदेवराव जगताप यांचे राजकीय सहकारी म्हणून परिचित होते. तसेच ते माजी राज्यमंत्री दिगंबररावजी बागल यांच्या बहिणीचे सासरे होते तसेच करमाळा कृषी उत्पन बाजार समिती करमाळा संचालक कुलदीप पाटील व प्रगतशील बागायतदार महेंद्र पाटील व झोनल ऑफिसर बॅकं ऑफ महाराष्ट्र आंनदराजे पाटील यांचे आजोबा होते.