तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ११० किलो वजनी गटामध्ये शिवराज टांगडे प्रथम - Saptahik Sandesh

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ११० किलो वजनी गटामध्ये शिवराज टांगडे प्रथम

0

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये झालेल्या तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा विद्यार्थी शिवराज नितीन टांगडे या विद्यार्थ्यांने ११० किलो वजनी गटामध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्याला क्रिडा शिक्षक एस.यू. बेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण वळेकर मुख्याध्यापक एस.जे.व्यवहारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे. त्याचे जेऊर परिसरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!