आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 5 ऑगस्टला “भव्य रक्तदान” शिबीर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्याचे आ.संजयमामा शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे 5 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, आ.संजयमामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वाढदिवस समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांचा वाढदिवस ३१ जुलैला असतो. या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा केलेला आहे, यामध्ये रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी ,वृक्षारोपण ,वह्या वाटप, नेत्र तपासणी आदी उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांचा सन्मान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल अशी माहितीही वाढदिवस समितीच्यावतीने देण्यात आली.
रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे उपस्थित राहणार असून याप्रसंगी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह गटाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते ,नेते उपस्थित राहणार आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत, तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे या मान्यवरांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबिर होणार असून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.