कुस्ती स्पर्धेत समृद्धी तळेकरचे यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड - Saptahik Sandesh

कुस्ती स्पर्धेत समृद्धी तळेकरचे यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


केम (संजय जाधव): जेऊर येथे दि. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या करमाळा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील ४९ किलो वजन गटात केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयाची विद्यार्थिनी कु. समृद्धी सचिन तळेकर हिने उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामुळे तिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

समृद्धीला तिचे वडील सचिन तळेकर, पै. मदन तळेकर तसेच क्रीडा शिक्षक बाळासाहेब सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

समृद्धीच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेश तळेकर, संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर, श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नागनाथ तळेकर यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी तिचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या कामगिरीबद्दल केम परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!