लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतून सामाजिक संदेश

केम(संजय जाधव) : लाल बहादुर शास्त्री विद्यालय सालसे या करमाळा तालुक्यातील माध्यमिक शाळेची यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक ग्रामस्थांसाठी सामाजिक संदेश देणारी ठरली. विसर्जन मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी विविध पोशाख परिधान करून सहभाग घेतला.

दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम व शालेय विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक स्पर्धांचे आयोजन सालसे हायस्कूलमध्ये करण्यात आले होते. पण गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरली. या विसर्जन मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, विविध प्रांतातील लोकजीवन, ऐतिहासिक, पौराणिक पात्र यांचे पोशाख करून नागरिकांचे लक्ष वेधले.

यावर्षी पाऊस पडला नसल्याने सद्यस्थितीत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतातील खरीप हंगामाची पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचा पोशाख परिधान करून ‘दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांना मदत करा’, ‘कर्जमाफी झालीच पाहिजे’ असे फलक हातात घेऊन शासनाकडे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी ही मिरवणूक ग्रामस्थांच्या अंतकरणाला स्पर्श करून गेली.

स्वामी विवेकानंद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी समाजातील तरुणांना विवेकानंदांचे आदर्श जीवन जगण्याचे विचार व बाबासाहेबांची ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ ही शिकवण दिली. समाजातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी जखमी झालेला तरुण अशी वेशभूषा करून तरुणांनी गुन्हेगारी विचारांपासून परावृत्त व्हावे व्हावे असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी पत्रकार होऊन ग्रामस्थांच्या निर्भीडपणे मुलाखती घेतल्या. न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सालसे संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश नामदेव सपकाळ व सचिव रवींद्र नामदेव सपकाळ, सर्व संचालक मंडळ यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळेतील सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्रीमती मनीषा बगाडे, सहप्रमुख श्री रमेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा तनपुरे यांनी सांस्कृतिक विभाग व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांची तयारी करून घेणाऱ्या पालकांचे अभिनंदन केले.

न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सालसे संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश नामदेव सपकाळ व सचिव रवींद्र नामदेव सपकाळ, सर्व संचालक मंडळ यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळेतील सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख श्रीमती मनीषा बगाडे, सहप्रमुख श्री रमेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा तनपुरे यांनी सांस्कृतिक विभाग व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांची तयारी करून घेणाऱ्या पालकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!