शिक्षक दिनानिमित्त २०१ शिक्षकांचा विविध शाळेत जाऊन केला सन्मान - Saptahik Sandesh

शिक्षक दिनानिमित्त २०१ शिक्षकांचा विविध शाळेत जाऊन केला सन्मान

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – शिक्षक दिनाचे औचित्य साधून निंभोरे (ता.करमाळा) येथील विमा सल्लागार धनंजय वळेकर यांनी जेउर व परिसरातील २०१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोल्हापूरी फेटा बांधून श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.

जेऊर येथील भारत हायस्कूल, भारत प्रायमरी, ज्युनियर कॉलेज,भारत महाविद्यालय,निंभोरे येथील छत्रपती संभाजी विद्यालय, जि.प.प्राथ.शाळा निंभोरे, शेटफळ, केडगाव, चिखलठाण येथील शाळांना भेटी देऊन शिक्षक दिन केला साजरा व शेवटी सायंकाळी भारत हायस्कूल जेऊर येथे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. वेळेअभावी भरपुर शिक्षकांपर्यंत पोहचू शकलो नाही असे वळेकर यांनी सांगितले.

धनंजय वळेकर हे २३ वर्षांपासून करमाळा तालुक्यात विमा सल्लागार आणि विमा प्रतिनिधी नेमणूक प्रशिक्षण अधिकारी(CLIA) म्हणून कार्यरत आहेत.

भारत हायस्कूल जेऊर येथे कार्यक्रमानंतर उपस्थित शिक्षक

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!