करमाळा न्यायालयात 171 प्रकरणे तडजोडीने निकाली व तर 5 कोटी 58 लाख 91 हजारांची वसुली..

करमाळा : करमाळा येथील न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यालयात एकूण 171 खटले तडजोडीने मिटले असून यामध्ये 5 कोटी 58 लाख 91 हजार 832 रुपये वसुली झाली आहे. करमाळा न्यायालयात आज (ता.9) रोजी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व दिवाणी व फौजदारी न्यायालय करमाळा येथे राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पॅनलप्रमुखपदी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश सौ.मिना एखे तसेच दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायाधीश आर.ए.शिवरात्री हे होते.

या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित 1776 प्रकरणांपैकी दिवाणी प्रकरणे 103 निकाली झाले असून, यामध्ये 4 कोटी 65 लाख 29 हजार 605 रुपयाची रक्कम वसुली झाली आहे तसेच यामध्ये फौजदारी प्रकरणे 33 निकाली झाले असून, यामध्ये 29 लाख 43 हजार 70 रुपये रक्कम वसुली झाली आहे तसेच दाखल पूर्व 2292 प्रकरणांपैकी तडजोडीने बँक कर्ज वसुली प्रकरणे 12 तर नगरपरिषद वसुली प्रकरणे 23 अशी एकूण 171 प्रकरणे तडजोडीने मिटले आहेत व एकूण रक्कम 5 कोटी 58 लाख 91 हजार 832 रुपये रक्कम वसुली झाली आहे.

तसेच पॅनल प्रतिनिधी म्हणून ए.व्हि.शिंदे व ॲड.पी.के.पवार यांनी काम पाहिले. यावेळी न्यायाधीश सौ.मीना एखे व न्यायाधीश श्री.शिवरात्री यांनी “राष्ट्रीय लोकअदालत” यावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी.एम.सोनवणे व ॲड.बाबूराव हिरडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी ॲड.विनोद चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी करमाळा बार असोसिएशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


