करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटला मिळाला राजमुद्राची दहीहंडी फोडण्याचा मान - Saptahik Sandesh

करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटला मिळाला राजमुद्राची दहीहंडी फोडण्याचा मान


करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट यांच्या गोविंदांच्या टीमला यंदा शहरातील छत्रपती चौक मधील राजमुद्रा ग्रूपची मानाची दहीहंडी फोडून विजेते पद मिळविण्याचा मान मिळाला.

या विषयी माहिती देताना संस्थेचे संस्थापक प्रा.महेश निकत म्हणाले की हे करमाळा शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट हे शैक्षणिक गुणवत्ते सोबतच इतर कला गुणांना वाव देणारे इन्स्टिट्यूट आहे. विद्यार्थ्यांनी 7 तारखेला झालेल्या दहीहंडी उत्सवात खूप चांगली कामगिरी करत तालुक्यातील नावाजलेली राजमुद्रा दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. यावेळी मागील काही विद्यार्थ्यांनी दिवस रोज सराव करून कालच्या दिवशी गायकवाड चौक येथे सलामी देऊन २००० रू बक्षीस घेत पुढे दत्त पेठेत ४ थर लावून ट्रॉफी आणि ३००० रू बक्षीस मिळवले. तसेच राशीन पेठेत सलामी देऊन ट्रॉफी मिळवली, त्यानंतर मेन रोड येथील दहीहंडी येथे सलामी देऊन बक्षीस व ट्रॉफी मिळवून पुढे मिळवत सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला विशेष म्हणजे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट चा यावर्षी प्रथमच प्रयत्न होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!